5.00(1)

सायबर सुरक्षा – रोटरी

  • Course level: Beginner

Description

1 ) रोटरी ची सुरुवात कोण केली ?

रोटरीची सुरुवात एका महान मानवाच्या दूरदृष्टीने झाली – पॉल हॅरिस.
त्यांनी 23 फेब्रुवारी 1905 रोजी रोटरी क्लबची स्थापना शिकागो येथे केली.

2) रोटरी म्हणजे काय

उद्योगधंद्यांत,व्यवसायात प्रसिद्धी मिळविलेल्या व्यक्तींनी विविध क्षेत्रांत, समाजाची सेवा करावी व अशी सेवा करणाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे म्हणून स्थापिलेली एक आंतरराष्ट्रीय नागरी संस्था. भूतदया, मानवतावादी व शैक्षणिक प्रकल्प यांच्या माध्यमातून विविध राष्ट्रांतील नागरिकांमध्ये सामंजस्य व मैत्री यांची जोपासना वृद्धिंगत व्हावी, हा रोटरी इंटरनॅशनल या संस्थेचा मुख्य उद्देश मानला जातो.

3) रोटरी चे स्वरूप काय आहे ?

रोटरी तीन भागांनी बनलेली आहे: आमचे क्लब, रोटरी इंटरनॅशनल आणि द रोटरी फाउंडेशन. एकत्रितपणे, आम्ही आमच्या समुदायांमध्ये आणि जगभरात चिरस्थायी बदल घडवून आणण्यासाठी काम करतो.
रोटरीचे हृदय म्हणजे आमचे सदस्य ! जे समाजसेवा आणि मैत्रीसाठी समर्पित असे लोक आहेत
रोटरी सदस्य आपल्या कल्पना इतरांसोबत सामायिक करतात, योजना बनवतात आणि त्यांना मूर्त स्वरूप देण्यासाठी धडपड करतात.

4) रोटरॅक्ट क्लब म्हणजे काय ?

समाजातील विविध क्षेत्रातील नेतृत्व करणाऱ्या व्यक्तिमत्वांशी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी, नेतृत्व आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यासाठी आणि सेवेद्वारे मैत्री वृद्धिंगत करण्यासाठी 18 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना एकत्र आणणारा क्लब म्हणजे रोटरॅक्ट क्लब होय .

5) इंटरएक्ट क्लब म्हणजे काय ?

12-18 वर्षे वयोगटातील तरुणांना नेतृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी एकत्र आणून त्यांच्यातील सेवा आणि मैत्रीभाव जागृत करण्यासाठी इंटरॅक्ट क्लब ही एक चांगली संधी उपलब्ध करून देते.

6) रोटरीच्या जगभरातील विस्तार किती आहे ?
जगभरात रोटरी १३० पेक्षा अधिक देशात पसरली असून ,१.२ दशलक्ष पेक्षा जास्त सदस्य,३५००० पेक्षा जास्त क्लब्स द्वारे आपली सेवा समाजाला देत आहेत आणि मैत्रीभाव वृद्धिंगत करत आहेत.

7) रोटरीच्या कार्यासंबंधी थोडेसे …

रोटरी 35 वर्षांपासून पोलिओचे उच्चाटन करण्यासाठी कार्यरत आहे . पृथ्वीवासियांना या रोगापासून मुक्त करणे आमचे लक्ष्य आहे. यासाठी आम्ही 1979 मध्ये फिलीपिन्समधील ६ दशलक्ष मुलांच्या लसीकरणासह सुरुवात केली. आज, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे एकमेव देश आहेत जिथे पोलिओ उरलेला आहे.
या शिवाय
जागतिक शांतता आणि सौहार्द ,
स्वछ पाणी आणि परिसर स्वच्छता ,
रोग प्रतिबंध आणि उपचार ,
माता आणि शिशु आरोग्य ,
शिक्षण ,
स्थानिक अर्थव्यवस्था आणि रोजगार ,
पर्यावरण संवर्धन
या क्षेत्रात देखील रोटरी कार्य करते.

8) मला रोटरी संदर्भात अधिक माहिती कोठे मिळेल ?
https://www.rotary.org
किंवा अधिक माहिती साठी रो. डॉ. विनोद लड्डा याना drladdavinod@gmail.com या E-Mail वर संपर्क करू शकता.

What Will I Learn?

  • Your Cyber Security Awareness Score

Topics for this course

प्रश्नमंजुषा

Quiz (Marathi)

Student Feedback

5.0

Total 1 Ratings

5
1 rating
4
0 rating
3
0 rating
2
0 rating
1
0 rating

Very good initiative... People must be aware about cyber security..

Free

Target Audience

  • School Students